सामाजिक परिवर्तनातून राष्ट्रनिर्माण: १०० वर्षांची वाटचाल
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय,पुणे येथे " सामाजिक परिवर्तनातून राष्ट्रनिर्माण: १०० वर्षांची वाटचाल"* हा कार्यक्रम 10 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे, खासदार(माजी) श्री. सुनील देवधर, माजी राष्ट्रीय सचिव(भाजप), संस्थापक, माय होम इंडिया लाभले होते व कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री प्रदीपदादा रावत ह्यांनी भूषविले. तसेच डॉ रवींद्र आचार्य व श्री प्रमोद रावत ह्यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रम प्रसंगी विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्यांचा भाषणातून राष्ट्र साधनेची 100 वर्ष ही केवळ एका संस्थेची शंभरी नव्हे, तर राष्ट्रनिर्मिती, संस्कार, शिस्त, सेवा आणि सामाजिक समरसता या मूल्यांची शंभर वर्षांची अखंड तपस्या तसेच भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाची गौरवगाथा आहे हे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहिले. डॉ ऐश्वर्या यादव ह्यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. सुनिता आढाव, प्राचार्या, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे व श्री. अशोक पलांडे उपाध्यक्ष, नियामक मंडळ व परिषद, डे ए सो ह्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.